केरळमध्ये उन्नी अप्पम तयार करण्यासाठी सबरीमाला टेंडर जिंकल्याबद्दल दलित व्यक्तीला मारहाण आणि

Share News:

ट्रॅव्हनकोर देवसवम बोर्डच्या ‘उन्नी अप्पम’ बनवण्याची निविदा एका दलित माणसाने जिंकली म्हणून त्याला मारून, जातीयवाचक शिव्या देऊन त्याचा दोन जणांनी छळ केला. जोपर्यंत उच्च वर्णीय पृथ्वीवरून नष्ट होत नाहीत तोपर्यंत या निविदामध्ये अस्पृश्यांनी भाग घ्यायचा नाही, असे म्हणत त्यांनी त्याला मारलं.

सुबी (४३ वर्ष) हा थेरीक्कावीला इथला रहिवाशी असून त्याने
ट्रॅव्हनकोर देवसवम बोर्डच्या ‘उन्नी अप्पम’ बनवण्याच्या निविदामध्ये भाग घेतला होता. त्यात तो जिंकला आणि त्याला ‘उन्नी अप्पम’ बनवण्याचा मान मिळाला. मात्र त्या निविदामध्ये भाग घेतलेल्या सर्वणांना हे पटलं नाही म्हणून त्यांनी सुबीला मारलं आणि त्याला जातीयवाचक शिव्या देऊन त्याच्यावर ते थुंकलेही.

सुबीने म्युझियम पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली आहे. जगदीश आणि रमेश अशी आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्यावर एस/ एसटी ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अजूनही त्यांचा शोध घेत आहेत.

निविदा ना जिंकल्याचा राग आल्यामुळे त्यांनी सुबीशी अशी वागणूक केली, असे सुबी याने सांगितले आहे. सुबीने गेल्यावर्षी ही या निविदामध्ये भाग घेतला असून त्याला अपयश अले. मात्र हरण्या- जिंकण्यावरून कोणीही कोणाशी अशी वागणूक करू नये, असे मत सुबीने व्यक्त केले आहे.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *