UPSC Ranking: भाजी विक्रेत्यांच्या मुलीने युपिएससी परीक्षेत ४९२ रँकिंग घेत वाढवला आई-बाबांचा स्वाभिमान !
मंगळवार दिनांक १६ एप्रिल दिनी युपिएससीचा निकाल लागला अनेक विध्यार्थी चांगल्या रँकिंग घेऊन उत्तीर्ण झाले, त्यातच स्वाती राठोड हि विध्यार्थीनी देखील उत्तीर्ण झाली, पण ह्यात विशेष म्हणजे, भाजी विकणाऱ्या आईबाबांची हि मुलगी आहे.
सुरुवातीला स्वाती हिचे आईवडील मुंबईत मजुरीवर काम करत होते कालांतराने तीचे आवडली सोलापूर स्तलांतर झाले व तिकडे गाड्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला, भाजी विक्रेतीमधून येणाऱ्या पैशांवरच त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. ह्याच परीस्थित स्वातीने युपिएससी परीक्षेत अभ्यास करून चांगल्या रँकने उत्तीर्ण झाली असून ४९२ वी रैंक घेत तिने हे मोठे यश मिळविले.
मुंबईत असताना स्वातीचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. कालांतराने सोपलूर मध्ये स्तलांतर झाल्यानंतर सोलापूर मधील भारतीय विध्यापिठ येते अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणात तीने वसुंधरा ह्या महाविद्यालयात आपलं बीए पूर्ण केले. सध्या स्वाती भूगोल ह्या विषयातून एम ए. च शिक्षण घेत आहे.
मुंबईत असताना तिथे तिचे वडील मजुरी करत होते. त्यानंतर राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. कुटुंबात आई, बाबा, एक भाऊ आणि एक बहीण आहे. आई बाबांच्या ह्या कष्टाळू प्रयत्नांना अपयश मिळू दिले नाही. स्वातीने परीक्षे चांगल्या रँकने उत्तीर्ण येऊन तिच्या आई वडिलांचा स्वाभिमान वाढवला आहे !
यूपीएससी परीक्षेसाठी मी स्वतः अभ्यास केला, तर फक्त ऑप्शनल विषयासाठी क्लास लावला होता. सिनिअरनी सांगितलेले पुस्तके अभ्यासासाठी वापरले, प्रश्नपत्रिका सोडविल्या. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे माझे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. मागील काही निकाल पाहता मला आयएएसची पोस्टिंग मिळेल अशी अपेक्षा आहे.
- स्वाती राठोड, यूपीएससी उत्तीर्ण, विद्यार्थिनी
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।