डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष जात पडताळणी मोहीम

Share News:

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष जात पडताळणी मोहीम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मोठ्याप्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली जाते, जसे  खाजगी, स्वयंसेवी संस्था तसेच शासनाचे विविध विभाग जयंती साजरी करत असतात. शासनाच्या सामाजिक न्याय विभाग देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमीत्त  कार्यक्रम व उपक्रम घेत असतात. तसेच समता पंधरवाडाही जयंती साजरी करत असतात. आता समता पंधरवाडा विभागाने समता पंधरवाड्या अंतर्गत २०२३- २४ मध्ये बारावी विज्ञान आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली आहे. यात सोयीचे म्हणजे हे प्रमाणपत्र लवकरात लवकर व जास्त कागदपत्रांची गरज न लागता  मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नीट, जेईई, एमबीए, पीएचडी व तत्सम अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संवैधनिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. आता यावेळी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार. अर्ज सादर करतांना अर्जदाराने त्याचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथ पत्र असे पुरावे हे साक्षांकित प्रती जोडून जात पडताळणीचा पूर्ण अर्ज वेळेत सादर करणे अपेक्षित आहे.

अर्ज वेळेवर सादर न केल्यास हि संधी गमावण्याची शक्यता आहे ,या संदर्भांतील सर्व प्रलंबित अर्जदारांना समितीने संदेश पाठविले आहे . अर्जदारांनी त्रुटींचा संपूर्ण भ्यास करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा पडताळणी कार्यालयात हज्जार राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहे .

 

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *