Ambedkar Memorial Indu Mill : इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पुन्हा प्रारंभाकडे

Share News:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येत आहे. (indu mill ambedkar statue ).

१२ एकर जागेतील या स्मारकाचे बांधकाम (सिव्‍हिल वर्क) पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर ओळखले जाणारे शिल्पकार राम सुतार लवकरच या पुतळ्याच्या बांधकामाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर स्मारकाची उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना समान वागणूक देण्याचा संदेश सर्वांना माहीत आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. भावी पिढ्यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या जागेवर तब्बल १,०८९ कोटी रुपये खर्चून ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

२०१५ मध्ये, पंतप्रधानांनी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या स्मरणासाठी खास जागा बांधण्यास सुरुवात केली. यात 100 फूट उंच एक मोठा चौक असेल आणि आतमध्ये हॉल, लायब्ररी, संग्रहालय आणि राहण्यासाठी जागा अशा वेगवेगळ्या इमारती असतील. ते पितळेचा खूप उंच पुतळाही बसवतील. सध्या, विशेष जागेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

१०० वर्षे सुस्थितीत राहावा, यासाठी सिमेंट काँक्रीटचा आणि स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

२२ हजार चौरस फुटांची भव्य लायब्ररी

बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी अनेक पुस्तके असलेले या स्मारकात मोठे ग्रंथालय असेल. तेथे एकाच वेळी २१० लोक अभ्यास करू शकतात. व्याख्याने आणि इतर कार्यक्रमांसाठीही खोल्या असतील.

वैशिष्ट्ये

ह्यात विशिष्ट वैशित्या म्हणजे १२ एकर जागेत विस्तीर्ण स्मारक बनवण्यात येत आहे, ह्या स्मारकाची उंची एकूण ४५० असून पुतळ्याची उंची ३५० असणार आहे. ह्या स्मारकाला १,०८९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे . पुतळ्याचे वजन ६००० मेट्रिक टन असून पुतळ्याला ब्राँझसजे आवरण ८५० मेट्रिक टन असणार आहे, वाहने पार्किंग साठी दुमजली बेसमेंट पर्किंगसुद्धा आहे,ज्यामध्ये ४७० वाहने पार्क होतील.

सरकारने  लवकरात स्मारकचे काम संपवावे : आनंदराज आंबेडकर

सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असले, स्मारकाचे काम ७० टक्के पूर्ण झालेलं आहे . पुतळा उभारण्यासोबतच  इतर उर्वरित कामे बाकी असून ते पूर्ण होण्यास दोन-अडीच वर्षांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे सरकारने स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभा केले होते.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *