डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  दिलेल्या मतदानाचा हक्क व त्याचे अधिकार या बाबत घेतलेला हा आढावा.  

Share News:

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  दिलेल्या मतदानाचा हक्क व त्याचे अधिकार या बाबत घेतलेला हा आढावा.  

xr:d:DAF-ETw3-ko:265,j:1926839498105892512,t:24041316

खर पाहता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आजवर भारतरत्न,बोधिसत्व ,महाकारुनिक अश्या अनके बिरुदानी त्यांना ओळखल जात परंतु बाबासाहेब हे या देशाचे खर्या अर्थाने राष्ट्रानिर्मते आहे . राष्ट्राच्या निर्मितीसाठी  त्यांनी दिलेले योगदान हे आजवर सर्वश्रुत आहे .मग ते दलितांच्या सर्वस्व हक्काच्या अधिकाराचा  लढा असो किंवा महिलांच्या साबलीकरणाचा प्रश्न असो. हे सर्व शक्य झाल केवळ त्यांनी भारतीय संविधानात केलेल्या तरतुदीमुळे .

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या स्वरुपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली, त्याच लोकशाहीचा महत्वाचा भाग म्हणजे मतदानाचा हक्क ! आज देशात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीच वातावरण असताना आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा आहे . याच अनुषंगाने त्यांच्या कार्याच्या त्यांच्या राष्ट्र निर्मिच्या कार्यापैकी एक म्हत्वाचे कार्य म्हणजे मतदानाचा हक्क होय .तर हेच महत्व जाणून घेऊयात आजच्या ह्या video मध्ये.

 

नमस्कार मी प्रवीण दाभाडे, दलित times मराठी मध्ये आपल स्वागत आहे ! 

 

आपल्या देशासाठी मतदान करण्याची शक्ती हा भारतासारख्या लोकशाही देशाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशात अनेकजण मत देण्यास पात्र आहेत, तर काही लोक त्याबद्दल उत्साही आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, 67.11% मतदान झाले, जे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त मतदान आहे.

 

तुमच्या मतामध्ये महत्त्वपूर्ण फरक पडण्याची क्षमता आहे. तुम्ही सध्याच्या सरकारवर असमाधानी असाल तर तुम्ही पुढील निवडणुकीत तुम्हाला हवे असणारे सरकार निउडून देऊ शकता. जर लोकांनी मतदान योग्य प्रतिनिधीना केले नाही तर तोच पक्ष आणखी पाच वर्षे सत्तेत असेल. अंततः जर देशतील शासन हे योग्य पद्धतीने चालत नसेल तर त्याला आपण जबाबदार आहोत कारण आपण त्यांना  निवडून देताना योग्य ती भूमिका घेतलेली नसते.  

 

जेव्हा “माझ्या मताने फरक पडत नाही” हा विचार आपल्या मनात येतो तेव्हा आपण खर्या अर्थाने लोकशाहीचे नुकसान करत आहोत हे आपण विसरता कामा नये . 

भारत सरकारने मतदारांना मतदान करण्याचे आव्हावन केले आहे जरी ते कोणत्याही उमेदवारावर असमाधानी असतील तर ते त्यांना . NOTA या पद्धतीचा मार्ग अवलंब करून ते  ना पसंती दर्शवू शकतात ,नोटा याचा अर्थ वरीलपैकी कोणीही नाही, लोकशाही सुद्रुड करण्याच्या दृष्टीनेआणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी आपण निश्चितपणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. 

 

तुमचे एक मत खूप महत्वाचे आहे कारण ते ठरवते की भविष्यात आपल्या देशाचे नेतृत्व कोण करेल. मतदानाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने, 30% लोक निवडणुकीत मतदान करत नाहीत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपली लोकशाही मजबूत राहावी यासाठी योग्य उमेदवार निवडण्याची ताकद तुमच्याकडे आहे. आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान महत्त्वाचे आहे. 

ज्यांनी आपल्याला  हा मतदानाचा हक्क दिला ते म्हणजे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आज आपण जन्म दिवस साजरा करत आहोत. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त समस्त भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

 

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *