मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या…

Share News:

मोतीहारी मध्ये पंचायत समिती सदस्याच्या पतीची भर रस्त्यात हत्या.

बिहारच्या मोतीहारी मधील आदापूर ठाणे परिसरातील घटना. भर रस्त्यात गोळी मारून हत्या करून मारेकरी पळून गेले.

आदापूर ठाणेच्या पंचायत समितीच्या सदस्या, सुनीता देवी यांचे पती बच्चा पासवान हे मूळ श्यामपूर गावचे राहणारे आहेत. ६ सप्टेंबर, बुधवारी बच्चा पासवान नेहमीप्रमाणे नहर रोड येथे प्रभातफेरीसाठी गेले असताना मोटारसायकल वरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. बहुतांश गोळ्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर मारल्या गेल्या आणि बच्चा पासवान यांचा जागेवरच मृत्यू झाला. घडलेला प्रकार कळताच मोठ्या प्रमाणात माणसं नहर चौकापाशी जमा झाली आणि रास्ता रोखून ठेवला. त्यांच्या समर्थकांनी त्यांचा मृतदेह उचलून नेण्यास नकार ही दिला.

घटना कळताच आदापूर ठाण्याचे प्रमुख चन्द्रिका प्रसाद आपल्या दलासोबत घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली. बच्चा पासवान यांचे समर्थक त्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात द्यायला तयार नव्हते. तरी, बऱ्याच वेळानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी नेण्यात आला. जवळपासच्या पोलीस ठाण्यांत सूचना देऊन मारेकरींचा शोध सुरु करण्यात आला आहे. “एफ. एस. एल. ची एक टीम घटनास्थळी पाठवून संपूर्ण घटनेचा तपास ही सुरु आहे”, असे रक्सौलचे डी. एस. पी. धीरेंद्र कुमार म्हणाले आहेत.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *