उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यातल्या एका दलित कुटुंबातील अल्पवयीन अपंग मुलीचा सामूहिक बलात्कार.

Share News:

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात दलित कुटुंबातील 17 वर्षीय अपंग मुलगी सामूहिक बलात्काराला बळी पडली.

15 ऑक्टोबरला पीडित मुलगी बकऱ्या चरण्याला घेऊन जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्याच दिवशी संध्याकाळी ती तिच्या राहत्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर बाजरीच्या शेतात गंभीर अवस्थेत सापडली. शरीरावर पूर्ण कपडे नाहीत आणि संपूर्ण देह रक्ताने माखलेला अशा भयानक अवस्थेत ती होती. सांकेतिक भाषेचा वापर करून तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले.

पीडितेला फिरोजाबाद जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले व त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी आग्रा येथील सरोजिनी नायडू वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या खाजगी भागात गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. पीडितेच्या काकांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी बलात्काराशी संबंधित आयपीसी कलम 376 अंतर्गत गुन्हेगारांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

गावकऱ्यांच्या सांगण्यावरून असे कळते कि पीडित मुलगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आहे. तिचे वडील, काका आणि मोठा भाऊ उदरनिर्वाहासाठी मजुरीचे काम करतात. शिवाय, पीडिता, तिच्या शिकण्याच्या अडचणी आणि संवाद साधण्यात अक्षमतेमुळे आधीच बऱ्याच आव्हानांना सामोरी जात असल्याचे कळले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तिची ओळख लपवण्यात अली आहे.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *