काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे

Share News:

‘काही गोष्टींना फक्त विरोध करून चालत नाही, त्यांना मूळापासून नष्ट केलं पाहिजे. मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाला फक्त विरोध करून काहीच उपयोग नाही. या आजारांना मूळापासून नष्ट केलेच पाहिजे आणि सनातन धर्माला ही.’ द्रविड मुन्नेत्र कळघम् पार्टीच्या उधयनिधी स्टॅलिन यांच्या तमिळ नाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अंड आर्टिस्ट्स असोसिएशनमधल्या या वक्तव्याने राजकीय विश्वात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप आणि नव्याने निर्माण झालेल्या INDIA या संघाने ही या विधानाचा विरोध केला आहे. ‘INDIA या विधानाचे अजिबात समर्थन करत नाही’ असे द्रविड मुन्नेत्र कळघम् पार्टीने स्पष्ट केले आहे.

‘तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे’. असे ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराचा विरोध दर्शविला आहे.

या घटनेच्या काही दिवसांनंतर आपल्या या विधानाचे समर्थन करत स्टॅलिन म्हणाले ‘नविन संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांना न बोलावणे हे आजच्या काळातल्या सनातनी जातीभेदाचेच एक उदाहरण आहे’. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खारगे यांनी या विधानाचे सर्मथन करत म्हटले, “जो धर्म माणसांना समानतेने वागवू शकत नाही तो एखाद्या आजारापेक्षा कमी नाही आहे”.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!