भारताबाहेरील बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण रविवारी वॉशिंगटन मध्ये करण्यात आले.

Share News:

भारताबाहेरील बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण रविवारी वॉशिंगटन मध्ये करण्यात आले.

१५ ऑक्टोबर रोजी वॉशिंगटनमध्ये मेरीलँड या उपनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनवला आहे. यापूर्वी त्यांनी सरदार पटेल यांचा पुतळा (statue of liberty) बनवला होता. बाबासाहेबांचा हा पुतळा भारताच्या बाहेर असलेला सर्वात उंच पुतळा ठरला आहे. पाचशेहुन अधिक अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून आलेली इंडिअन-अमेरिकन माणसं अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित होती. या सोहळ्यासाठी जमलेल्या माणसांमधून फक्त ‘जय भीम’ चे नारे ऐकू येत होते.

बाबासाहेबांच्या या पुतळ्याला ‘ समतेचा पुतळा (statue of equality)’ असे म्हंटले आहे. त्याबद्दलचे मत व्यक्त करताना Ambedkar International Center चे अध्यक्ष रॅम कुमार म्हणाले, ” आम्ही या पुतळ्याला statue of equality या साठी म्हणत आहोत की भेदभाव ही फक्त भारतातली समस्या नसून संपूर्ण जगाची समस्या आहे जी विविध स्वरूपात पहायला मिळते”. या अनावरण सोहळ्यासाठी १० तास प्रवास करून आलेल्या महिंद्र राजवाडे यांनी आनंद व्यक्त करत म्हंटले, ” भारताच्या बाहेर पहिल्यांदाच बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा असून त्यांच्या अनुयायींसाठी ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे”. उद्घाटन सोहळा आटोपल्यावर तिथे जमलेल्या इंडिअन-अमेरिकन कडून काही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय बहुतांशी सवर्ण आहेत. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशात बाबासाहेबांचा एवढा उंच पुतळा उभारणं ही घटना जगभरातील आंबेडकरवाद्यांसाठी अभिमानाची घटना ठरली आहे.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *