‘सत्यशोधक युवा संशोधन केंद्र’ या पहिल्याच निवासी आवाराचे उद्घाटन नागपूर येथे झाले..

Share News:

१५ ऑक्टोबर २०२३ रोजी एकलव्य संस्थेने ‘सत्यशोधक युवा संशोधन केंद्र’ या पहिल्याच निवासी आवाराचे उद्घाटन नागपूर येथे केले. या वर्षी सत्यशोधक संस्थेच्या स्थापनेला १५० वर्ष पूर्ण झालीआणि म्हणूनच सावित्रीबाई फुले आणि जोतीबा फुले यांना आदरांजली म्हणून या निवासी आवाराची स्थापना केली आहे. ग्रामीण भागातील पहिल्या पिढीत शिकणाऱ्या मुलांना एकलव्य संस्थेने नेहमीच पाठींबा आणि प्रोत्साहन दिले आहे. एकलव्य संस्थेचे हेच प्रमुख ध्येय असून हे ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गावरचे पहिले पाउल हे केंद्र ठरले आहे. या संशोधन केंद्राद्वारे सर्वप्रथम ग्रामीण भागातील पहिल्या पिढीत शिकणाऱ्या ५० विद्यार्थांना घेऊन एक ‘पायाभूत अभ्यासक्रम’ तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम निवासी असून तो ६ महिने कालावधीचा आहे. हा अभ्यासक्रम उच्च दर्जाच्या शिक्षणावर आणि नेतृत्व विकासावर लक्ष केंद्रित करते.

एकलव्य संस्थने सुरु केलेली ही शैक्षणिक चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या पिढीत शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत आहे. त्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी अनेक प्रसिद्ध महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार करत आहे.
आजवर या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. याच चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि फुले दाम्पत्यांच्या शैक्षणिक चळवळीला आदरांजली म्हणून एकलव्यने ‘सत्यशोधक युवा संशोधन केंद्रा’ ची स्थापना केली. या केंद्राच्या उद्घाटनासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. डेटा आर्किटेक्ट आणि अमेरिकेतल्या आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे सदस्य अनिल वगाडे, माजी भारतीय रेल्वे सेवा अधिकारी अनिल रामटेके, परदेशी शिक्षण सल्लागार आणि भाषा प्रशिक्षक डॉ. अनुराधा बेले, आय. आय. एम. नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी धावड अंड एन.इ.इ.आर.आय. चे डॉ. अर्विद्न शाक्य या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

“आम्ही उच्चस्तरीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी प्रवेशाच्या तयारीसाठी निवासी अभ्यासक्रम आयोजित करणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही विविध क्षेत्रातील विद्वान, धोरणकर्ते, विचारवंत आणि नेत्यांची पुढची पिढी घडवण्यासाठी बूट कॅम्प, सेमिनार, परिषद, हिवाळी आणि उन्हाळी शाळा आणि विविध उपक्रम राबवू. या संस्थेचे उद्दिष्ट आहे की सरकार, कॉर्पोरेट्स, शिक्षण संस्था आणि समुदायांसोबत भागीदारी करून उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण आणि इतर प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्यासाठी विकास प्रकल्प राबविणे”, असे मत एकलव्य संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे यांनी संशोधन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात मांडले. तसेच एकलव्याचे सह संस्थापक प्रशांत चव्हाण म्हणाले, “निवासी अभ्यासक्रमाची मुख्य भर पीअर लर्निंगवर आहे. भारतातील विविध प्रदेश आणि विविध उपेक्षित जाती आणि आदिवासी समुदायातील पन्नास विद्यार्थ्यांसह उपक्रम राबवला जाणार आहे”.

“एकलव्य येथे आम्ही दुर्लक्षित विद्यार्थ्यांचे जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण आणि व्यवसाय मिळवून त्यांना विविध क्षेत्रात आघाडीवर जाण्यास सक्षम बनवून त्यांच्या करिअरमधील यशस्वी संक्रमणाची सोय करतो. आमच्‍या रणनीतीमध्‍ये समुदायाकडून जागरूकता आणि त्यासंबंधित आदर्श यांचा समावेश आहे”, असे सह संस्थापक स्मिता ताटेवार यांनी सांगितले.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *