आपल्या भारताची लोकशांही ही इतर देशांपेक्षा अतिशय भक्कम आणि अत्यंत ताकदवर लोकशाही मानली जाते. ह्याच लोकशाही कडे इतर देश कोणत्या नजरेने पाहत आहेत. लोकशाहीचा मुख्य घटक म्हणजे देशात होणाऱ्या निवडणुका. जाणून घेऊयात ह्यांच निवडणूकीचा निकाल हा भारताच लोकतंत्र जगभरात कश्या प्रकारे प्रदर्शित करत आहेत.
2021 मध्ये अमेरिकेतील ‘फ्रीडम हाऊस’ संस्थेने भारताच्या लोकशाहीला पर्शियली फ्री डेमॉक्रसी अस म्हटल होत. म्हणजेच भारतात लोकतंत्र पूर्णपणे काम करत नसल्याचं फ्रीडम हाऊस ह्या संस्थेने म्हटल होत. स्वीडनच्या एका वी- डेम संस्थेने भारत इलेक्टोरल ऑटोक्रेसी आहे अस विधान केलं होतं. म्हणजेच भारतातच लोकतंत्र धोक्यात असल्याची शंखा संपूर्णताहा जगभरात पसरली होति. भारत सरकारने ह्या सगळ्याची दखल घेतलीच होति.परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही एक गोष्ट स्पष्ट झाली की भारतातील जनतेने फक्तं एकाच मुद्यावरून मतदान केले नाही. म्हणूनच ह्या वेळेस सरकार कोणाचीही आली तरीदेखील विरोधी पक्ष हि संसदेत तितकाच ताकदवर ठरेल.19 व्या शतकात ब्रिटनचें पंतप्रधान बेंजामिन डिजराईल ह्यांनी असे सांगीतले होते की ‘मजबूत विरोधी पक्ष असल्याशिवाय कोणतीही सरकार फार वेळ टिकु शकत नाही’.
ह्या दोन हजार चोविसच्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल ने वर्तवलेले अंदाज हे ज्यास्तित ज्यासत प्रमाणात चुकीचेच ठरले. कारण ह्या निवडणुकीत वर्तवलेल्या अंदाजा नुसार एन डी ए युती आणि इंडिया युती दोन्हीही आपलं प्रदर्शन दाखवण्यात असमर्थ ठरल्याचं दिसत होते.
केंद्रात मोदीच येणार हे मात्र नक्की होत कारण व्होट फॉर मोदी किंवा व्होट against मोदी असा ह्या निवडणूकीचा मुददा बनला होता. कारण मोदी ची गारेंटी असा अजेंडाच भारतीय जनता पक्षाने बनवला होता. इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तरी पक्षाने आपल्या पंतप्रधानाच्या नावाचा अजेंडा हाती घेऊन निवडणूक लढली असावी.
परंतू दुसरीकडे मात्र सगळ्यांनाच केंद्रात मोदीच येतील अशी खात्री वाटत नव्हती कारण देशभरात भारतीय जनता पक्षाला 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने 282 जागा मिळवल्या होत्या,2019 मध्ये 303 जागा भाजप ने मिळवल्या तर 2024 च्या ह्या लोकसभा निवडणूकीत 240 जागा भाजपने मिळवल्या.
जाणून घेऊयात ह्या निवडणूकीत भाजपच्या बाजूने असा निकाल का लागला?
1) भारतीय जनता पक्षाने ह्या निवडणूकीत गरीब , शेतकरी, युवा, आणि महिला वर्गाला आपले पहिले लक्ष मानले. त्यानी सर्वाधिक जोर हा मोफत योजनांवर दिला होता.प्रधानमंत्रीगरीब कल्याण अन्न योजने द्वारे भारतातील 80 कोटी नागरिकांना मोफत राशन देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने केलें होते.PM आवासी योजना असो किंवा PM उज्वला योजना असो किंवा आयुष्मान भारत योजना असो मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात अश्या योजनेत 22लाख कुटुंबीयांना समाविष्ट ही करुण घेतले कदाचित ह्याच मुळे देखिल भाजपला ह्या निवडणूकीत यश मिळाले असावे.
परंतू ह्या वेळेला मात्र निवडणूकीत रोजगाराचा मुद्दा उचलून धरला जात होता. परीक्षा होत नाहीयेत, विविध क्षेत्रातील भरत्या होत नाहीयेत, परीक्षांचा निकाल लागत नाही, पेपर लीक होतोय असे मुद्दे समोर येत होते. अग्निविर योजनेवर देखिल टीका होताना दिसत होती. जनता म्हणत होति की मोफत राशन तर ठीक आहे परंतू रोजगाराच काय, रोजगार मिळवणार कुठून?
2] भाजपा गृहीत धरत होती की राम मंदिराचा मुद्दा हा भाजपला ह्या निवडणूकीत फायदेशीर ठरेल म्हणूनच 22 जानेवारी 2024 रोजी रामलला ह्यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहोळा मोठया उत्साहात साजरा झाला. ह्या सोहळ्यात खुद पंतप्रधन नरेंद्र मोदी ही ह्या कार्यक्रमाच्या मध्यवर्ती होते. त्याचं प्रमाणे भाजपचे नेते योगी आदित्यनाथ ह्यांनी देखिल ह्या सोहळ्यात पुढाकार घेतला होता. परंतू अयोध्येच्या बाजूच्या जागांवर म्हणजेच बाराबंकी, फैजाबाद, अमेटी, आंबेडकर नगर आणि सुलतानपुर अश्या पाचही जागांवर भाजपचा पराभव झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी मुसलमान समाजाला घेऊन केलेल्या वक्तव्याचा हि फारसा प्रभाव जनतेवर पडला नाही. राज्यस्तांच्या बासवडा सभे मध्ये नरेंद्र मोदी ह्यांनी म्हटलं होत की काँग्रेस सत्तेत आली तर ती जनतेची संपत्ती ज्यास्त मुल असणाऱ्याना वाटून टाकेल ‘ त्यांचा हिंदु महिलांच्या मंगळसूत्रावर डोळा आहे, ते हिंदु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र मुसलमानांना देऊन टाकतील.अस वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केल होत.ह्या बाबतीत विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार ही केली होती. नरेंद्र मोदी ह्यांनी एवढ्या स्पष्ट शब्दात इतकी गंभीर टीका कदाचित पहिल्यांदाच केली असावी. पण ह्या सगळ्याचा काही एक परिणाम झाला नाही त्या बासवाडा जागेवर ही भाजप चा पराभवाच झाला. अनेक जाणकार आणि पत्रकारांच म्हणणं होत की बंगाल मध्ये भाजपचा प्रभाव जाणवेल कारण बंगाल मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. परंतू तिथेही भाजपचा प्रभाव कमीच जाणवला कारण 2019 साली पच्छिम बंगाल मध्ये 18 जागा मिळवलेल्या भाजपला 2024 मध्ये फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले.
3] तिसर करणं म्हणजे नरेंद्र मोदीची लोकप्रियता एकंदरीत सगळया कारणामुळे वाटत होत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होत आहे परंतू स्थानिक पातळीवर अस अजिबात जाणवत नव्हती. जनता म्हणत होति की नरेंद्र मोदींनी आतंरराष्ट्रीय पातळीवर भारताला फायदाच करून दिला आहे. नरेंद्र मोदी ह्यांनी प्रत्येक वेळी भारताच्या विदेशी शात्रूनसाठी आक्रमक भूमिका घेतली होति ज्यात नव्या भारताच्या शत्रूंना घरात घुसून मारण्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परंतू विषेशकांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची हि निती दक्षिण आशिया व चीनच्या विरोधात काम करू शकते परंतू आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र नरेंद्र मोदी ह्यांच्या ह्या भूमिके कडे इतर देश संशयाने बघतात. काही दिवसांपूर्वीच कॅनडा ने आपल्या नागरिकांची हत्या केले असल्याचे गंभीर आरोप भारतावर लावले. अमेरिकेने अश्या प्रकारचा प्रयत्न भारताने अमेरिकेतही केला असल्याचे सांगितले आहे. ह्या सगळया आरोपांची दखल भारत सरकार ने घेतली.
अमेरिकेतील हार्वर्ड विश्वविद्यालयाचे प्राध्यापक एमके झा ह्यांनी हि सांगितलं होत की इतिहास साक्षी आहे देशातील राजकीय बदलाला स्थानिक घटकांन पेक्षा व आंतरराष्ट्रीय घटक परिणामी ठरतात. जर भौगोलिक राजकीय पातळीवर थोडीही अनीच्छीतता आणि संशय असेल तर ह्याचा काही न काहीसा फटका हा लोकतान्त्रिक देशांना नक्कीच बसेल.
त्या मुले कदाचित नरेंद्र मोदी ह्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरची भूमिका त्यांच्या पक्षाला मदत करुण देणारी ठरली आसवी पण दूसऱ्या बाजूने पहिलं तर काहीश्या आंतरराष्ट्रीय घटकांमुळे त्यांचं नुकसान झालं असावं अस म्हण्यास हरकत नाही.
4] ओडिशात भाजपने चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे. ओडिशातील 21 जगांमधून 20 जागांवर भाजपला विजय मिळाला. ओडिशातील विधानसभेत देखिल भाजप चांगल्या प्रकारे यश मिळवुन आपली सत्ता स्थापित करत आहे.
दक्षिण भारतात बघितल तर भाजपने तेलंगणा मध्ये 8 जागा, आंध्रप्रदेश मध्ये 3 जागा तर केरळात 1 जागा मिळवली. ह्या तिन्ही राज्यातील जागा भाजप साथी महत्वाच्या होत्या. तेलंगणा बनल्या नंतर भाजपची 1च जागा तिथे होति भाजपला 20 टक्के इतकेच मतदान मिळत होते. मात्र आता तिथे 30 ये 35 टक्के इतकी वाढ भाजपच्या मतदानात झाली असल्याचे दिसतंय. वंचित समाज्याची मत आणि प्रंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या लोकप्रियतेने भाजपला हे यश मिळवुन दिले.
कर्नाटक मध्ये 2019 साली भाजपने 25 जागांवर विजय मिळवला होता परंतु ह्या वेळेस मात्र तिथे भाजपला 17 जगांवरच समाधान मानावे लागले. कर्नाटकात भाजपचे 5 टक्के मतदान घटताना दिसले. तमिळनाडूचा एक्झीट पोल सांगत होता की तामिळनाडूत भाजपच्या 3 जागा येतील परंतू तस झाल नाही पण भाजपच्या मतदानात मात्र नक्कीच 3.6 टक्के ते 10.7 टक्के इतकी वाढ झाल्याचं तिथे दिसून आल. केरळ मध्ये भाजपने त्रिपुरा ची एक जागा मिळवली भाजपने ह्या जागे साथी अतोनात प्रयत्न केले होते, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या जागेवरून स्वतः निवडणूक लढले होतें व जिंकून ही आले होतें.
तर एकंदरीत बघता दक्षिण भारतात भाजपाने 2019 साली 29 जागा मिळवल्या होत्या, ह्या वेळेस देखिल 29 च मिळवल्या आहेत परंतू काँग्रेसने मात्र मागच्या वेले पेक्षा ज्यास्त म्हणजेच 40 जागा मिळवल्या आहेत.
ह्या सगळया गोष्टी वरुन एक निष्कर्ष निघतो की ह्या वेळेस काँग्रेस आणि भाजप जे मुद्दे घेऊन निवडणूकीत उतरले होतें ते जनतेला तितकेसे पटलेले नव्हते प्रत्येक राज्याचे आपले आपले असे स्थानीक पातळीवरचे मुद्दे होते. दुसऱ्या बाजूने रोजगाराचा मुद्दा जोर धरत होता, एका बाजूला नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवरची भूमिका लक्षात घेतली जात होती तर ह्या निवडणूकीत भारतीय मीडियाने आणि एक्सिट पोल ने दिलेले अंदाज हि भारतीय लोकतंत्राने आणि भारतीय लोकशाहीने चुकीचे ठरवले.
संकलन : मानसी मुंढे
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।