खरे युवा आदर्श – राजू केंद्रे

Share News:

ग्रामीण आदिवासी भागात वाढलेले, पहिल्या पिढीतील उच्च शिक्षित, ब्रिटिश सरकारची चेवनिंग शिष्यवृत्ती प्राप्त आणि ‘एकलव्य इंडिया’ चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ‘राजू केंद्रे’ हे आदर्श ठरले आहेत.

राजू हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी-खंदारे या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म भटक्या समाजातील कुटुंबात झाला. आईवडिलांचं प्राथमिक शिक्षण ही झाला नसून त्यांनी राजू यांना शिकवलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाला. नंतर ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेले असताना आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि यामुळे काही महिन्यातच त्यांना तिथलं शिक्षण सोडून परत यावं लागलं. पण इथेच हार न मानता त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं. राजू हे त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिक्षित आहेत.

ते पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच थांबले नाहीत तर आपलं पदव्युत्तर शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ‘ग्रामीण विकास’ या विषयातून पूर्ण करून ग्रामीण – आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी एक शैक्षणिक चळवळ उभी केली. ही चळवळ म्हणजेच ‘एकलव्य इंडिया फॉउंडेशन’. ही संस्था ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्याचं काम करते. फक्त आदिवासीच नाही तर दलित आणि इतर वंचित समजांमधून येणाऱ्या मुलांसाठी देखील ते काम करतात. पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या या विध्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण तसेच मोठमोठ्या विद्यापिठांच्या प्रवेश परीक्षांसाठी मुलांच्या कार्यशाळा घेणं हे कार्य देखील या संस्थेतर्फे केलं जातं. एकलव्य संस्थेतर्फे १०००हुन अधिक मुलांना आज पर्यंत उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली आहे.

हे सामाजिक कार्य सुरु असतानाच राजू यांना SOAS, लंडन विद्यापीठ येथे ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग शिष्यवृत्तीवर मिळावी. त्यावर त्यांनी एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केलं. एवढंच नाही तर स्वीडिश इन्स्टिट्यूट (स्वीडन) आणि ग्लोबल अकॅडमी, बॉन (जर्मनी) यांच्याकडून देखील त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. राजू समाजकार्य विषयात net, set असून सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे त्यांनी दोन वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम ही केले आहे.राजू केंद्रे यांनी सुरु केलेली ही शैक्षणिक चळवळ फक्त सामाजिक पातळीपूर्ती मर्यादित न ठेवता वैयक्तिक पातळीवर देखील सुरु ठेवली. फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्ये निवड, हिंदुस्तान टाइम्स यंग अचिव्हर 30 अंडर 30 यादीत समावेश, ब्रिटिश कॉन्सिल – ७५ यंग अचिव्हर्स हे व असे अनेक सन्मान प्राप्त राजू केंद्रे आताच्या युवकांसाठी खरे आदर्श आहेत.

 

 

 

 

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *