वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ह्यांनी इच्छा व्यक्त केली असून सुध्दा त्यांना विरोधी इंडिया आघाडीत सामील केलं गेलं नाही. आंबेडकरांनी २०१९ च्या लोक सभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला विचारणा केली होती पण अजून देखील काँग्रेस कडून काही निमंत्रण आलेलं नाही. आम्हाला सुद्धा इंडिया आघाडीचं घटक होऊन भाजपशी लढायला आवडेल अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
ह्याचं नेमक कारण ?
काँग्रेस आणि आंबेडकरांमधला ऐतिहासिक संघर्ष. वैचारिक दृष्ट्या आंबेडकर आणि गांधीमध्ये दलित उतदाराच्या संदर्भात अनेक मतभेद होते. यासोबतच पुणे करार ह्या भेदाला कारणीभूत आहे. स्वंतंत्र लढ्यानंतर देखील हे एकत्र येताना दिसले नाही. आंबेडकर आणि काँग्रेस हे नेहमी एकमेकांवर विरुद्ध निवडणुकीत लढत राहिले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांचे मतदार म्हणजे दलित, आदिवासी आणि मुसलमान असून वंचित बहुजन आघाडीसोबत केलेला करार हा त्यांचा मतदार वाटू जाऊ शकतो. आंबेडकर हे आपले मोठे स्पर्धक होतील ह्या भीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांना युती मध्ये सामील करून घेत नाही असं म्हणतल जातंय. प्रकाश आंबेडकरांनी बऱ्याच वेळा शरद पवारांवर सडेतोड टीका केली आहे आणि त्यादोघांमध्ये असलेला वाढ हा वर्षांवर्षे सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडी हे बहुजन समाजाचा राजकारण करत असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्यात मोठ्या मतदार गटाला म्हणजे मराठा गटाच्या विरोधात लढले आहे. जर ही युती झाली तर तो मतदार संघ गमवायची भीती त्या दोन पक्षांना असल्याचं सांगितल जातंय.
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।