“आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू.”

Share News:

अकोला : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात विजयादशमीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरएसएसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी मणिपूर हिंसाचारावर आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं.

त्यांच्या या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मोहन भागवत यांचं भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं.

भारतीय जनता पक्ष म्हणजेच संघ आहे. त्याचबरोबर मोहन भागवत म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत. ते लोकांचं मन खराब करायचं काम करतात. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानंतर त्यांनीच कारवाई केली होती.

त्याचबरोबर माणिपूरच्या संदर्भात देखील त्यांनी तेच केलं. तेच दंगली घडवून आणतात. सध्या ते फक्त निवडणुकांसाठी सावरासावर करत आहे. आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू.”

दरम्यान, मोहन भागवत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “निवडणुकांमध्ये मतदान करणं, हा सर्वांचा अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करायलाच हवं.

सर्व लोक मतदान करतील, यासाठी आरएसएसचे कार्यकर्ते काम करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी पाहून मतदान करू नये, त्याचबरोबर मतदार भडकावू भाषण ऐकू नये. डोकं शांत ठेवून कोण चांगलं काम करतो? याचा विचार करून मतदान करायला हवं.”

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *