गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता? महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी घडामोड

Share News:

दिल्ली भाजपच्या बैठकीनंतर मोठे राजकीय बदल होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या बदलानंतर गिरीश महाजन यांना महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून नेमण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य असतानाही महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. भाजपने 28 जागांवर लढवून केवळ 9 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे आपल्याला राज्य सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केली आहे आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात ठेवून पक्षासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन हे राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते असून पक्षाचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच, ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. त्यांच्या संयमी स्वभावामुळे आणि सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांमुळे ते उपमुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांच्या आगामी योजनांची चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आली असून विधानसभा निवडणुकीसाठी जनादेश यात्रा काढण्याची योजना आहे. या यात्रेचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यांनी पक्ष संघटनेसाठी ब्लू प्रिंट सादर केली आहे आणि संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील हे बदल भाजपसाठी महत्वाचे ठरणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संयमी स्वभावाचा लाभ महायुतीच्या घटक पक्षांसोबत संबंध सुधारण्यासाठी होऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या या नव्या रणनितीने काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी : अभिषेक खाडे

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *