बीडमधील धक्कादायक घटना. जमिनीच्या वादावरून एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली.

Share News:

बीडमधील धक्कादायक घटना. जमिनीच्या वादावरून एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली. भाजप आमदाराच्या पत्नीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल.

बीडच्या वाळूंज गावात एक धक्कादायक घटना घडली. जमिनीच्या वादावरून एका महिलेची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस आणि अन्य दोघांवर बीडच्या आष्टी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेचे वय ४० वर्षे असून ती पारधी समजातील आहे. पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, वाळूंज शिवारातील जमीन ५० ते ६० वर्षांपासून त्यांच्याकडे आहे. अगदी त्यांच्या वडिलांपासून ती जमीन कसली जात आहे. पण रघु, राहुल आणि प्राजक्ता धस यांचा त्या पारधी कुटुंबाला जमिनीतून हाकलण्याचा प्रयत्न सुरु होता. अनेक दिवसांपासून हे तीघे त्यांना त्रास देत होते, असे ही पीडितेने सांगितले. १५ ऑक्टोबरअ पिडीता शिवारात काम करत असताना रघु आणि राहुल ने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ता धस ही तिथे होत्या आणि या सर्व प्रकाराला त्या प्रोत्साहन देत होत्या, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. या तिघांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अजून ही घडलेल्या प्रकाराबाबत तपास करत आहेत.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!