महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव येते तीन दलित तरुणांना चोरीच्या संशयावरून मारहाण…

Share News:

महाराष्ट्र :

शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव येते तीन दलित तरुणांना चोरीच्या संशयावरून

झाडावर उलट लटकवून गावाच्या काही लोकांनी मारहाण केली. पिडीत तरुण ह्यांनी बाजूच्या उंदीरगाव येथील गलांडे वस्तीवरून एक बकरी आणि तीन कबूतर चोरल्याचे आरोपींना संशय होता.

आरोपी युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे, दुर्गेश वैद्य ह्यांनी पिडीत शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड ह्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलट लटकवून केबल वायर आणि काट्यांनी बेदम मारल आणि अमानवी कृत्य केल्याचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. तिघही गंभीर जकमी झाले असून त्यांना जवळच्या कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही तीन दलित तरुण मुलं मोलमजुरी करणारी असून त्यांची ही मारहाणीची व्हिडिओ दोन दिवसांनी व्हायरल झाली ज्यात पिडीत तरुण मारहाण करण्याऱ्या आरोपींच्या हात जोडून माफी मागतानाचे दृश्य पाहायला मिळतात. हरेगाव येथे बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

“त्यांनी आम्हाला घरातून उचलून युवराज गलांडेच्या शेतात नेऊन आंबाच्या झाडाला उलट लटकवून मारल. युवराज गलांडे आणि मनोज बोडखेने आमचे कपडे काढले. त्यांच्या बुटांवरची थुंकी चाटायला लावली.”, शुभम माघाडे (२१) ह्यांची क्विंत ह्या डिजिटल न्यूज पोर्टल ला सांगितल

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!