‘बिग बॉस ओटिटी ३’ मध्ये झळकणार शिवानी कुमारी, निर्मात्यांनी दिले ‘देसी गर्ल’ असे नाव !

Share News:

२१ जून पासून सुरू झालेला ‘बिग बॉस ओटिटी पर्व ३’ हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस ओटिटी ३ चे सूत्रसंचालन अनिल कपूर करत असून बिग बॉसच्या घरात १६ स्पर्धकांनी प्रवेश केलेला आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे, यावेळी देखील ओटिटीच्या बिग बॉसमध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सरस् आणि युट्यूबर्स चा दबदबा आहे तर अभिनय जगातील केवळ तीन-चार नावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी स्पर्धकांमध्ये एक नाव खूपच गाजत आहे, ते म्हणजे शिवानी कुमारी. पण ती कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

सोशल मीडिया एक मनोरंजनाचे साधन आहे जिथे लोक प्रसिद्ध होण्यासाठी विविध व्हिडिओ बनवतात. सोशल मीडियाच्या मदतीने लोक भरपूर पैसे कमवतात. अशीच एक इन्फ्ल्यून्सर म्हणजे ‘शिवानी कुमारी.’
एका दलीत घरातील जन्म असलेली शिवानी ही मूळची उत्तर प्रदेशातील ओरैया जिल्ह्यातील अरायारी गावातील रहिवासी आहे. शिवानीचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तिच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या आईने कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेतली. शिवानीची आई एका हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्याचवेळी शिवानीला सोशल मीडिया बद्दल माहिती मिळाली.

शिवानीने सुरुवातीला टिक टॉक या ॲपवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती वेगवेगळया गाण्यांवर व्हिडिओ बनवायची. त्यांनतर शिवानीने तिच्या गावाकडच्या वातावरणावर तेथील परंपरेवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. शिवानी कुमारी तिच्या गावात राहून मजेदार सोशल मीडिया कंटेंट तयार करु लागली. सोशल मीडियावरील शिवनीच्या व्हिडिओंना नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली. टिक टॉक बंद झाल्यावर शिवानीने इंस्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तिचे युट्यूब ब्लॉग्स हे चांगलेच व्हायरल होऊ लागले. काही दिवसांनी तिचे फॉलोवर्स वाढू लागले आणि शिवानी घराघरात पोहोचली.
जेव्हा शिवानी कुमारीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा शेजारचे तिला वेडी म्हणायचे तिला टोमणे मारायचे. शिवानीच्या आईला तिने व्हिडिओ बनवणे हे आवडत नसे. याच रागातून शिवानीची आई एक दिवस घर सोडून निघून गेली होती. परंतु शिवानीने कधीच हार मानली नाही. तिने व्हिडिओ बनवणे सुरूच ठेवले.

गरीब घरची परिस्थिती, एका वेळी चप्पल घेण्यासाठी देखील पैसे नव्हते परंतु आज शिवानीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर तीचे ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तीचे एक युट्यूब चॅनेल देखील आहे, ज्यावर तिचे २.२४ लाख सब सबस्क्राइबरस् आहेत. शिवानीचे व्हिडिओ ब्लॉग खूप पसंत केले जातात, म्हणूनच शिवानीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. सोशल मीडियामुळे तिची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. आता शिवानी कुमारी सोशल मीडियाच्या दुनियेत खूप नाव कमावत असून तिच्या आईलाही तिचा अभिमान वाटतो. अभिनेता राजपालची मुलगीही शिवानी कुमारीची फॅन आहे. ती शिवानी कुमारीला भेटायला आली होती, ज्याबद्दल तिने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिवानी कुमारीला एकेकाळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता, पण आज ती रील्स आणि युट्यूब चॅनेलवरून लाखो रुपये कमवत आहे.

एवढेच नव्हे तर आज शिवानी कुमारी स्वबळावर प्रसिद्धी मिळवत असून ती लोकप्रिय शो ‘बिग बॉस ओटिटी ३’ मध्ये दिसणार आहे. जिचे निर्मात्यांनी ‘देसी गर्ल’ म्हणून वर्णन केले आहे. देसी गर्ल शिवानी कुमारी शो मध्ये खळबळ माजवेल असे त्यांचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी शिवानी कुमारीचा प्रोमो रिलीज केला होता, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या सूट-सलवारमध्ये दिसत आहे. त्या प्रोमो व्हिडिओ मध्ये शिवानी म्हणते की, “तुम्ही शहराच्या खूप मुली पाहिल्या असतील, परंतु आता गावातील देसी मुलगी पाहण्याची वेळ आहे. मी ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांचे मनोरंजन करून दाखवेल.” तर लोकांचे लक्ष आता शिवानी कुमारी बिग बॉस ओटिटी ३ वर तीचे वेगळे असे स्थान कसे निर्माण करते याकडे लागले आहे.

प्रतिनिधी: मृणाली जठार

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *