साताऱ्यातील माण तालुक्यात एका दलित महिलेला भर चौकात मारहाण. दोन आरोपींना अटक.

Share News:

साताऱ्यातील माण तालुक्यात एका दलित महिलेला भर चौकात मारहाण. दोन आरोपींना अटक.

साताऱ्यातील माण तालुक्यातील पानवण गावातील घटना. एका दलित महिलेने पैसे परत मागितले म्हणून चार जणांनी मारहाण केली. महिलेला म्हसवड प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.

नेमकं घडलं काय?

साताऱ्यातील एका दलित महिलेला मारहाण केली. चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले यावरून राग येऊन त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी व उसाने भर चौकात मारण्यात आले. तसेच धारदार शस्त्रांनी वार ही केले. देवदास नरळे, पिंटू नरळे, संतोष नरळे, जनाप्पा शिंदे ही आरोपींची नावे समोर आली आहेत.

पोलिसांचे मत काय?

पिडित महिलेने व तिच्या कुटुंबियांनी म्हसवड पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली. चार ही आरोपींवर आय. पी. एस. च्या सेक्शन 354 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!