नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पस चे अनावरण, जाणून घ्या नालंदा विद्यापीठाचा इतिहास.

Share News:

नालंदा विद्यापीठाचा शतकांपासून चालत आलेला वारसा पुन्हा साकार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले आहे. नालंदा विद्यापीठाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असं म्हणतात की, जगात विद्यापीठांची स्थापना होण्याआधीच नालंदा विद्यापीठाने अनेक शतकांपूर्वीच आपली ख्याती मिळवली होती. नालंदा हे जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं.

हे विद्यापीठ जगातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. याची स्थापना इसवीसन ४२७ मध्ये झाली होती. या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था होती, त्यामुळे अशा प्रकारचे हे जगातील पहिले विद्यापीठ मानले जाते. असे म्हणतात की, जगभरातून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. मध्य आणि पूर्व आशियातील सुमारे १० हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते या संदर्भात नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे? येथे कोण-कोण शिक्षक होते? कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी हे विद्यापीठ ओळखले जात असे? याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

आधुनिक जगाला नालंदा विद्यापीठाची ओळख १९व्या शतकामध्ये झाली. अनेक शतकांपासून हे विद्यापीठ जमिनीखाली गाडले गेले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना येथे काही जुन्या वस्तू सापडल्या होत्या. १८१२ साली बिहारच्या स्थानिकांना येथे बौद्ध मूर्ती आढळल्या, ज्यामुळे विदेशी इतिहासकारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी येथे उत्खनन सुरू केले, परंतु नालंदा विद्यापीठाचा खरा शोध १८६१ साली लागला. याचे श्रेय अलेक्झांडर कनिंगहॅम यांना दिले जाते.

गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. गुप्त सम्राट हिंदू होते, परंतु त्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल सहानुभूती होती, म्हणून त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठात विविध अभ्यासक्रम शिकवले जायचे. मुख्यत: वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्त्वज्ञान, गणित, आणि खगोलशास्त्र यांचा अभ्यास केला जात असे. सहाव्या शतकात आर्यभट्ट हे या विद्यापीठाचे प्रमुख होते असे मानले जाते.
नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन अनेक विद्वान चीन, कोरिया, जपान, श्रीलंका, आणि इंडोनेशियात गेले आणि त्यांनी तिथे आपल्या ज्ञानाचा प्रसार केला. बौद्ध धर्माच्या प्रसारात या विद्वानांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.

नालंदा विद्यापीठात अनेक महान व्यक्तींनी अध्यापन केले आहे. येथे नागार्जुन, बुद्धपालित, शांतरक्षित, आणि आर्यदेव इत्यादी शिक्षक होते. या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. चीनचे प्रसिद्ध पर्यटक आणि विद्वान ह्वेन सांग, फाह्यान, आणि इत्सिंग येथे कधी तरी शिक्षणासाठी आले होते. ह्वेन सांग नालंदाचे आचार्य शीलभद्र यांचे शिष्य होते. माहितीनुसार, ह्वेन सांग ६ वर्षे या विद्यापीठात शिकले आणि त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

माहितीनुसार, नालंदा हे एक परिपूर्ण विद्यापीठ होते. येथे ९ मजल्यांचे ग्रंथालय होते, ज्यात जवळपास ९० लाख पुस्तके होती असे सांगितले जाते. विद्यापीठात ३०० खोल्या आणि ७ मोठे हॉल होते. कॅम्पस अनेक एकरांमध्ये पसरलेला होता. या ग्रंथालयाला आग लावण्यात आल्यानंतर ते ३ महिन्यांपर्यंत जळत होते, यावरून ग्रंथालयात किती पुस्तके असावीत याचा अंदाज येतो. ग्रंथालयात भारतीय इतिहास आणि विविध विषयांवरील पुस्तके ठेवली होती.

नालंदा विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान प्रसारित केला जात होता. जे कुठेच तो शिकवल जात नव्हता, त्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी नालंदात शिकवला जात होत्या. त्यामुळे परदेशातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी येथे नाव नोंदविले. नालंदा विद्यापीठाने अनेक वर्षांपासून ज्ञान प्रसारित करण्याच काम केल होत, ज्यामुळे तो सर्वथा ७०० वर्षांपर्यंत चालला. इतक्यात अनेकदा याला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
नालंदा विद्यापीठावर अनेकदा हल्ले झाले, पण ७०० वर्षांपर्यंत या विद्यापीठ स्थिर राहिलं. पण, १२ व्या शतकात बख्तियार खिलजीने हल्ला करून विद्यापीठाला आग लावल्याचं घडलं. या काळात विद्यापीठाला भारी नुकसान झालं. खिलजीचा विद्यापीठ उद्धस्त करण्याच्या कारणांवर इतिहासकारांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते तो बौद्ध धर्मांच्या द्वेषापायी यात उध्वस्त करण्यात आला, अशा काहींच्या मते संपत्तीच्या अफवांमुळे आक्रमण केला गेला होता असही म्हटल जात !

by Megha Mahajan

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *