विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत ?

Share News:

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती पेक्षा वरचड राहीली. आता लोकसभेच्या निकाला नुसार विधानसभेचा कौलं पाहता महाविकास आघाडी बाजी मारताना दिसत आहे

महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदार संघ आहेत त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. म्हणजेच ४८ लोकसभा मतदार संघात 288 विधानसभा मतदार संघ आहेत. ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये महायुतीला १७ जागा, महाविकास आघाडीला ३० जागा तर इतर मध्ये 1 जागेवर सांगलीतले काँग्रेस बंडखोर खासदार विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. या नुसार जर विधनसभेत कुठे कोण आघाडीवर येईल यांचा जर विचार केला तर महायुती 123 जागांवर आघाडिवर दिसत आहेत तर महाविकास आघाडी 154 जागांवर आघाडी घेईल अशी शक्यता आहे . बहुमताचा आकडा आहे १४५. तब्बल ३१ जागांनी महाविकासं आघाडी महायुती पेक्षा पुढें दिसत आहे. म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेत येण्याची चिन्ह दिसुन येत आहेत तर इतर मध्ये ११ जागा आघाडीवरील दिसत आहेत.

पाहुयात महायुतीच्या कोणत्या मतदार संघात महविकास आघाडी पुढे आहे.

लोकसभा निकालानुसार भाजपचे 105 आमदार आहेत पण भाजपच्या 42 मतदार संघात मविआला लीड भेटु शकते. शिंदेच्या शिवसेनेचे 40 आमदार आहेत त्यापैकी 17 मतदार संघात महाविकास आघाडी लिड घेताना दिसत आहे. अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत त्यापैकी 25. मतदार संघात महाविकास आघाडीला लिड भेटत आहे. महायुतीच्या 84 मतदार संघात महाविकास आघाडी लिड घेत आहे ही महायुती साठी चिंतेची बाब आहे.

पाहूयात महाराष्ट्रा मधील वेगवेगळ्या विभागातील ही आकडेवारी,

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत लोकसभेच्या निकालानुसार भाजपला 15 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 1 जागा तर आजित दादाच्या राष्ट्र‌वादीला 1 जागा जाण्याची चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस 29 जागा, ठाकरे गटाला 4 जागा, तर शरद पवार गटाला 8 जागा व इतर 4 जागा असा विधानसभेचा निकाल लागण्याची शक्यता दिसत आहेत, म्हणजेच भाजपला 14 जागांचा नुकसान तर काँग्रस लां 14 जागांचा फायदा होताना दिसतं आहे.

 

मराठवाडयात विधानसभेच्या एकुण 46 आमदार लोकसभेच्या निकाळा नुसार जर पाहिलं तर महायुती मध्ये भाजप 3 जागांवर, शिंदे गट ३ जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 5 जागांवर येण्याची शक्यता आहे.तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 17 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 4 जागा ,शरद पवार गटाला १० जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज लोकसभेचा नीकाला वरुन लावला जातोय म्हणजेच भाजपला मराठवाड्यात 13 जागांवर नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहेत, आणि काँग्रेसला 9 जागांचा फायदा आहे.

उत्तर महाराष्ट्रात  एकुण विधानसभेच्या 48 जागा आहेत त्यातून महायुती मध्ये भाजपला 23 जागा, शिवसेना शिंदे गटाला 5 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे अस लोकसभेचा निकालातून समोर येत आहे, महाविकास आघाडीत काँग्रेस 8 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 1 ,राष्ट्रवादी शरद पवार गटाला 9 जागा तर इतर 5 जागांवर महाविकास आघाडी बाजी मारेल असा अंदाज लोकसभेच्या निकालानुसार लावला जात आहे.

मुंबई +ठाणे+कोकण ह्या भागात एकुण 72 जागा आहेत. लोकसभेच्या निकाला नुसार विधानसेत भाजपला 29 जागा, शिवसेना शिंदे गटाला 11 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा अश्या महायुतीला एकुण मुंबई+ठाणे+कोकण मध्ये 41 जागा मिळण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 15 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5 जागा, तर इतर 4 जागा मिळतील असा दावा लोकसभेच्या निकाल वरुन केला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकुण 60 जागा आहेत.त्यानुसार लोकसभेच्या निकाला नुसार पहिलं तर भाजपला 15 जागा, शिवसेनेला शिंदे गटाला 3 जागा अजित पवार हयांच्या राष्ट्रवादीचा 6 जागांवर आघाडी दिसत आहे.महाविकास आघाडीत काँग्रेस ११ जागा, गकरे गट 5 जागा, तर राष्ट्र‌वादी शरद पवार गट 20 जागांवर महाविकास आघाडी लीड होताना दिसत आहे.

अर्थात हा कौल लोकसभेच्या निकाला नुसार आहे. विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी कीती जागा लढवतात त्यावर ही बरच काही अवलंबून असेल, पण लोकसभेत कोणत्या उमेदवाराच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी आहे हयाचा विचार केल्यास महाविकास आघाडी विधानसभेत सत्येत येताना दिसत आहे.

Report by : Mansi Mundhe

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!