डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष : ठाकरे गटाची सरकारवर टीका !

Share News:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादरमधील इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर राज्य सरकारकडून उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारक प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१८ मध्ये स्मारक प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली.

इंदु मिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम थांबल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक बांधणीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. कंत्राटदारावर अंकुश नसल्यामुळे स्मारकाचे काम ठप्प झाले असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंदूमिलमधील डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाच्या थांबलेल्या कामावरून ठाकरे गटाने शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. अगदी कोरोना महामारीच्या वेळी देखील स्मारकाचे काम थांबले नव्हते परंतु शिंदे आणि भाजप सरकारने गेल्या वर्षभरात स्मारकाच्या कामाकडे लक्ष न दिल्याने स्मारकाचे काम अर्ध्यातच थांबले आहे अशी जबरदस्त टीका ठाकरे गटाने पोस्टमधून केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे ठप्प झालेले काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत शिंदे-भाजप सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे. दादरमधील इंदूमिल कपाऊंड येथे बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येत आहे. २०१८ साली स्मारकाला मंजूरी मिळाली आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. कराराप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. आम्ही अगदी २०१९ मध्ये कोरोनासारख्या कठीण काळातदेखील ह्या स्मारकाच्या कामात खंड पडू दिला नव्हता. मात्र गेले वर्षभर स्मारकाच्या कामाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठकच घेतली नाही, परिणामी कंत्राटदारावर अंकुशच राहिलेला नाही आणि स्मारकाचे काम ठप्प झालेले आहे, अशी नाराजी शिवसेना ठाकरे गटाने एक्स पोस्टमधून व्यक्त केली आहे.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *