डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आपण पाहणार आहोत आंबेडकरी तरुणांचा सांस्कृतिक पर्वाचा प्रवास.

Share News:

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आपण पाहणार आहोत आंबेडकरी तरुणांचा सांस्कृतिक पर्वाचा प्रवास. 

बदलत्या जगातील बदलती एकंदरीत परिस्थिती पाहता आंबेडकरी तरुण हा नवनवीन प्रयोग करण्यास सात्यत्याने प्रयत्नशील राहत आहे.
त्या मध्ये प्रामुख्याने इ-कॉमर्स,रॅप,लोककला संगीत . गझल ,पॉप संगीत, कॉमिक्स या सारख्या विविध कलाप्रकारातून पुढच्या पिढीपर्यंत आंबेडकरी विचारांची सांस्कृतिक घडी बसविण्याचा या सगळ्या तरुणांचा प्रयत्न आहे. या सगळ्या धाडसाला तितकाच आंबेडकरी जनता देखील सोशल मीडिया सारख्या माध्यमांद्वारे प्रतिसाद देत आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समाजातील तळागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरी कलावंत हा प्रयत्नशील राहिला आहे , अगदी त्या सगळ्या चळवळीला अनेक प्रतिभावंत कलाकार मंडळींचा वारसा देखील लाभला आहे म्हणून कदाचित कि काय, आजही आंबेडकरी चळवळीतला कलाकार हा ग्रामीण भागापासून ते शहरी भाग आणि आता थेट विदेशात देखील त्याची सांस्कृतिक छाप पडताना आपण पाहत आहोत.

या सगळ्या अलीकडच्या वाढत्या महागाई आणि जागतिकिकरण,बदलते तंत्रज्ञान,व्यासायिक संध्या याचा बारीक अभ्यास करून हि सगळी आंबेडकरी विचारांची तरुण मंडळी त्यांचा स्वतःचा व्यावसायिक स्पेस निर्माण करत आहेत .

ई कॉमर्स आणि नीलखील बोर्डे : यातच संभाजीनगर मधील तरुण निखिल बोर्डे याने चक्क आंबेडकरी समाजाची जीवन जगण्याची पद्धतीचा अभ्यास करून थेट आंबेडकरी ब्रँड बोधिसत्व या नावाने निर्माण केला . या मध्ये प्रामुख्याने रोजच्या दैनंदीन जीवनातील वापरातील टी-शर्ट,शालेय वस्तू ज्या मध्ये पेन ,टोपी अश्या विविध वस्तूंचे उत्पादन निखिल बोर्डे करत आहे आणि समाजातील अनेक तरुणांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात फ्रॅन्चायसी मॉडेलद्वारे घेऊन येण्याचा निखिल प्रयत्न करत आहे.येत्या काळात बोधिसत्व हा ब्रँड देशातील अनेक आंबेडकरी चळवळीत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचेल असा आशावाद निखील व्यक्त करत आहेत.

स्टॅन्ड-अप कॉमेडी द्वारे सुरु झालेला प्रबोधनाचा प्रवास : अंकुर तांगडे – असा कला प्रकार जो केवळ उच्च वर्णीय समूहात आणि भांडवली जगात किंवा मुख्य प्रवाहातील माध्यमा मध्येच दाखवला जातो. परंतु ब्लू मटेरियल्स’ या ग्रुपच्या माध्यमातून अंकुरने तांगडे देश- विदेशात कॉमेडी शो करत सामाजिक प्रबोधन करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आपल्याला यशस्वी होताना दिसत आहे.अंकुर हिने आजवर अनेक वेगवेगळ्या भागात आणि देश विदेशात विनोदाच्या माध्यमातून सामाजिक प्रसबोधनाचे कार्यक्रम केले आहेत. या कलाप्रकारच्या माध्यमातून समाजातील जातीवाद ,त्यांचे अधिकार आणि हक्क यावर ती परखड भाष्य करते. अनेक कलाकारानं एक हक्काचं व्यासपीठ देण्याचा तिचा प्रयत्न आहे.

आंबेडकरी विचार कॉमिक्स च्या माध्यमातून लहान बालकांपर्यंत पोहचवण्याचा सुरज वाघमारे यांचा प्रयत्न होता,फुले-शाहू ,आंबेडकर यांचा विचार सहज आणि समजेल अश्या मराठी भाषेत कसा पोहचवता येईल या विचारातून निर्मितीला आलेली कॉमिक्स हि संकल्पना. आज महाराष्ट्र भरातील अनेक पालक या कॉमिक्स च्या माध्यमातून आपल्या मुलांना ते आंबेडकरी विचार शिकवताना दिसत आहे.

आंबेडकरी रॅपर : विपीन तातड– अमरावतीच्या एक छोट्याश्या गावातला हा तरुण आज रॅप च्या माध्यमातुन बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ सांगण्याचा प्रयत्न करत आहे.अनेक विद्यापीठात आज त्याला बोलावलं जात आहे.समाजातील प्रश्न ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आधुनिक विचार, यासारख्या महत्वपूर्ण विचारणा प्रेरीत होऊन विपीन तातड हा तरुण कला क्षेत्रात त्याची वेगळी ओळख निर्माण करत आहे.’जयभीम कडक’ हे रॅप देशभरात हिट झाले असून त्याच्या ‘रॅपटोळी ग्रुप’चे देशभरात शो होत आहेत .

अनेक नवनवीन लेख वाचण्यासाठी आम्हला नक्की फॉलो करा..

संकलन : प्रवीण दाभाडे

 

 

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *