चंद्रयान-३ मुळे भारताने खरोखरंच इतिहास रचला आहे. १४ जुलैला चंद्रयानने आकाशात झेप घेतली आणि २३ ऑगस्टला ६.०४ हे यान चंद्रावर पोहोचले. आता पर्यंत ज्या ज्या राष्ट्रांना चंद्रावर जाण्यासाठी यश आला ते कधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू नाही शकले. पण भारताने ते शक्य करून दाखवला आहे. ” चंद्रयान-३ चे बजेट अवघं ६०० करोड असून एखाद्या अंतराळावरच्या हॉलिवूड सिनेमाचं ही बजेट ६०० करोडपेक्षा जास्त असतं”, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. त्यावेळी त्यांनी आदित्य- एल १ या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इसरो) सूर्याचा अभ्यास करणाऱ्या मोहिमेबद्दल माहिती दिली. या मोहिमेचं बजेट ४०० करोड आहे असे त्यांनी सांगितले. हे यान २ सप्टेंबरला आकाशासाठी झेपवलं असून याचा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे.
एकीकडे भारत वैज्ञानिक क्षेत्रात एवढी प्रगती करत चालला आहे तर दुसरीकडचे दृश्य पाहता ती भारताची अधोगती आहे की काय असा प्रश्न पडतो. भारतात गटारसाफ करणं म्हणजेच मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर मज्जाव असूनसुद्धा आजही ते काम केलं जातंय. गेल्या पाच वर्षात एकूण ३३९ गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सांगितले आहे. हाताने मैल उचलणे यावर बंदी असून ही कोणतेही सुरक्षा उपकरणे न देता हे काम सुरूच आहे. या कामाचे त्या त्या कामगारांना फारच कमी पैसे दिले जातात. आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबाला हजरो रुपये देऊन त्या माणसाची किंमत ठरवली जाती.
एका पाठोपाठ एक यान आकाशात पाठवून आपण जर एवढी प्रगती करत चाललो आहोत तर गटार साफ करण्यासाठी एखादं यंत्र का नाही वापरलं? एवढा खर्च जर आपण आकाश स्वारींसाठी करत आहोत, आपले वैज्ञानिक एवढे प्रगत आहेत तर त्यांनी त्या पैश्यातून आता पर्यंत एखादं मशीन का नाही बनवलं?
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।