महाराष्ट्रातील भाजप-एनडीएचा पराभव: ठाकरे-पवारांना सहानुभूती, अटी तटीची लढाई

Share News:

5 जून 2024

महाराष्ट्रातील भाजप-एनडीएचा पराभव: ठाकरे-पवारांना सहानुभूती, अटी तटीची लढाई

  1. भारतीय जनता पार्टी-नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रातील निम्म्या जागा गमावल्या आहेत.
  2. महाविकास आघाडी (एमवीए) आणि इंडिया ब्लॉकने महाराष्ट्रात विजय मिळवला आहे.
  3. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांनुसार काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी जोरदार यश मिळवले आहे. भाजपा-एनडीएचा पराभव का झाला, यामागील पाच प्रमुख कारणे खाली दिली आहेत:

भाजपा-एनडीएचा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पराभव कसा झाला?

 

1. पक्षफोडीचा परिणाम
पक्ष फु्टीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली सहानुभूती ही शिंदे व अजित पवार गटांच्या तुलनेत जास्त होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उ.बा.ठा) २१ पैकी 9 जागांवर विजय मिळवला, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १४ पैकी 7 जागा मिळाल्या. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ला 8 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं.

2. काँग्रेसने मारलेली मुसंडी
महाराष्ट्रात काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये दोन आणि २०१९ मध्ये एक जागा मिळवलेल्या काँग्रेसने या वेळी किमान 12 अधिक जागा जिंकल्या आहेत. २०१४ मध्ये एनडीएकडे गेलेल्या गडचिरोली चिमूर, लातूर, नांदेड आणि नंदुरबार या जागा पुन्हा काँग्रेसने काबीज केल्या आहेत.

3. मुंबईतील एनडीएची घसरण
२०१९ मध्ये एनडीएने मुंबईतील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या. या वेळी भाजपने फक्त एक तर शिंदेच्या सेनेने एक जागा जिंकली आहे, तर सेना (यूबीटी) ने तीन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपच्या उज्ज्वल निकम यांना हरवले.

4. मराठवाड्यातील मोठी नुकसान
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भाजपला मराठवाड्यात मोठे नुकसान सहन करावे लागले. २०१९ मध्ये भाजपने चार जागा जिंकल्या होत्या, तर एकत्रित शिवसेनेने तीन जागा जिंकल्या होत्या. या वेळी इंडिया आघाडीने आठ पैकी सात जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीला केवळ औरंगाबाद मधून यश मिळालाय.

5. विदर्भातील इंडिया अलायन्सची वाढ
विदर्भातील १० पैकी ८ जागा भाजप-शिवसेना (२०१९) यांनी जिंकल्या होत्या. या वेळी महायुतीला 10 पैकी फक्त 3 जागेंवर समाधान मानावं लागणार आहे तर इंडिया ब्लॉकने 7 जागेवर विजय मिळवला आहे.

अत्यँत अटी तटीच्या लढाईत इंडिया ब्लॉकने एनडीएला महाराष्ट्रात मोठी हानी पोचवली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरली. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजू जमेची दिसत आहे

प्रतिनिधी : अभिषेक खाडे

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!