दलित आणि आदिवासी यांच्या जमिनी लुबाडणारे अंबानी आणि अदाणी

Share News:

अदाणी-अंबानी विरोधात मोदी बोलले तर त्यात इतकं नवल काय ?

नुकत्याच तेलंगणा यथे झालेली मोदींची सभा हि भारतातील इतर सभेपेक्षा विरोधी पक्षांना अधिक संभ्रमित करणारी आहे, त्याच झाला असं कि गेल्या दहा वर्षात मोदी इतके अस्वस्थ कधी राहिले नाहीत असं विरोधक आणि राजकीय विश्लेषक आपला मत मांडत आहे.संविधान खतरे मे है . हीच प्रचाराची मूळ campaign line विरोधी पक्षाकडून चालवली जात आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाहिला सुद्धा मिळत आहे. अगदीच अलीकडे मोदींनी एका वाहिनीला गेल्या १० वर्षात पहिल्यांदा मुलखात दिली अर्थातच मुलाखत संपूर्णपणे स्क्रिप्टेड होती अश्या स्वरूपाच्या टीका सुद्धा विरोधी पक्षाकडुंन केल्या गेल्या.आश्चर्यचा भाग म्हणजे मोदी शहा यांचे जवळचे आणि निकटवर्तीय म्हणून ज्यांना संपूर्ण देश ओळखतात आणि ज्यांच्यावर विरोधी पक्षाने अनेकदा टीकेची झोड उमटवली गेली ते म्हणजे अदानी आणि अंबानी. अगदी मुंबई येथील धारावी विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने अदानी ला झालेला विरोध ते थेट अंबानी यांच्या विकास प्रकल्पा पर्यंतची टीका हि विरोधी पक्षांसाठी जणू काय सत्तेत यायचं असेल तर अदानी अंबानी विरोध झालाच पाहिजे म्हणून त्यांच्या साठी जादूची छडीच कि काय असा कयास लावला जात असे.
परंतु कालच्या तेलेंगणाच्या सभेतून ज्या पद्धतिने मोदी यांनी राहुल गांधी यांचे अडाणी आणि अंबानी यांच्या सोबत जे मैत्रीचे संबंध जोडले ते मात्र धक्का देणारे आहेत आणि संभ्रमित करणारे सुद्धा . त्याला राहुल गांधी यांनी असे प्रतिआव्हान केले कि हिम्मत असेल तर अदानी अंबानींच्या घरी ed पाठवा, मोदीजी तुम्ही थोडे घाबरले आहात का असा टोला सुद्धा राहुल गांधी यांनी लगावला आहे,
या सगळ्या प्रचारादरम्यान मात्र देशातील दलित समूहातील हालअपेष्टा या बाबत कोणी बोलण्यास तयार नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे. अंबानी अदानी हे या देशातील भांडवलदार आहेत जे येथील आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लुबाडण्याचे काम करत आहे . अपेक्षा आहे येत्या काळात या मुद्द्यांवर सुद्धा भाष्य केलं जाईल

संकल – प्रवीण दाभाडे

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *