बाळासाहेब आंबेडकर ह्यांची राहुरी इथे जन आक्रोश महासभा

Share News:

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ह्यांनी आपले मत बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेत मांडले. सभेत मोठ्या संख्येने बहुजन आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ही सभा काही दिवसांपूर्वी हरेगांव येते दलित तरुणांवर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या प्रसंगानंतर भरण्यात आली. आंबेडकरांनी पिडीत तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबाला ह्या दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. त्यांच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, युवा नेते सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते.

“बरोबर निवडणुकीच्या वेळी हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातात, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पहिल जात, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप आणि आरएसएसची सत्ता काढून टाका.”, प्रकाश आंबेडकर त्या सभेत म्हणाले.

ह्या सभेच्या निमित्ताने आंबेडकरांनी प्रधानमंत्री ह्यांच्या मतदाराशी नसलेल्या एकनिष्ठपणावर टिका केली आणि त्यांचं मत मोदींविरुद्ध असेल असं ठाम वक्तत्व केले.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *