Dr. Babasaheb Ambedkar Memorial Bhavan Navi Mumbai : लाखो नागरिकांची भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाला !
नवी मुंबई मधील ऐरोली ह्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन नवी मुंबई महानगरपालिकाद्वारे उभारण्यात आले आहे. ह्या स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचा आणि त्यांच्या जीवनाचा चित्रात्मक जीवनचरित्र प्रदर्शित होते.
बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण इतिहास आणि त्याचे दुर्मिळ भाषणे आणि होलोग्राफिक शो ह्याद्वारे बाबासाहेबांची माहिती लोकांपारेंत पोचवली जाते. स्मारकामध्ये ध्यान केंद्र सुद्धा आहे जेणे करून येणारे अनुयायी तेथे ध्यानसाधना देखील करुशकतील.
ह्याच स्मारकाला पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. रविवारी म्हणजेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी तब्बल १० हजाराहून अधिक आंबेडकरी अनुयायी आणि नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक भवनाला भेट दिली.
मागील सव्वा दोन वर्षामध्ये तब्बल २ लाख ५७ हजार नागरिकांनी भेट दिली आहे.याचाच अर्थ समाजात बाबासाहेब आंबेडकरांचं विशेष स्थान आहे आणि त्यांच्या आदर्शांचं महत्त्व आहे.
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।