तेलंगणामध्ये चोरीच्या संशयावरून दोन दलित युवकांना मारहाण.

Share News:

तेलंगणामध्ये चोरीच्या संशयावरून दोन दलित युवकांना मारहाण.

बकऱ्या चोरण्याच्या आरोपाखाली मालकाने दोन दलित युवकांना शेडखाली उलटे टांगून मारहाण केली व नंतर खालून धूर हि केला.

नेमकं घडलं काय?

तेलंगणाच्या मंचिरियाल तालुक्यातील मंदामरी भागातील घटना. दोन दलित युवकांना बकऱ्या चोरण्याच्या आरोपाखाली उलटे टांगून मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच ना थांबता त्यांना खालून धूर सोडून पुन्हा मारहाण केली.

कोमुराजुला रामुलू असे या शेतमालकाचे नाव असून या संपूर्ण प्रकारचा विडिओ ही वायरल झाला आहे. विडिओमध्ये कोमुराजुला रामुलू, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलाने दोन्ही पीडितांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोमुराजुला रामुलूने हरवलेल्या बकऱ्यांच्या बदल्यात त्या दोघांकडून पैसे मागितल्याचे ही समोर आले आहे.

दोघांना मारहाण करून सोडल्यावर त्यातील एक युवक घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेबाबत चौकशी करून sc/st कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!