तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार.

Share News:

तमिळनाडूमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दलिताने बनवलेलं जेवण खाण्यास दिला नकार.

तमिळनाडूतील करूर जिल्ह्यातील घटना. वेलन चेट्टियार पंचायत युनियन शाळेेतील प्राथमिक शाळेेच्या विद्यार्थ्यांनी दलित महिलेने बनवलेला नाश्ता खायला नकार दिला. मुख्यमंत्री ब्रेकफास्त योजनेतरफे मोफत जेवण बनवून शाळेत वाटण्यात आले. मात्र ३० पैकी १५ विद्यार्थ्यांनी ते जेवण खाण्यास नाही म्हटले. सुमती या अरुणथियार समाजातील असून त्यांनी ते जेवण बनवले होते. यावर पालकांनी, दलिताच्या हातचे जेवण आमच्या मुलांना खाऊ देणार नाही आणि जोपर्यंत सुमती जेवण बनवेल तोपर्यंत मुलं मुळीच ते अन्न खाणार नाहीत असे स्पष्ट केले.

घडलेला प्रकार कळताच जिल्हाधिकारी टी. प्रभू शंकर शाळेत पोहोचले. जर असाच भेदभाव होत राहिला तर मुलांवर आणि पालकांच्या विरोधात जातीभेदासाठी तक्रार नोंदवली जाईल, असं ठामपणे ते म्हणाले. एवढेच नाही तर, सुमतीने बनवलेले जेवण ही त्यांनी खालले.

घटनेच्या ५ दिवसांनंतर ही फक्त २ च मुले ते जेवण खाऊ लागली. देशभरात अशा घटना आणि जातीभेद वाढत असून यावर गांभिरयाने विचार करायला हवा.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!