जातीय वाचक टीका: आक्षेपार्ह निनावी पत्रक,नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची परिस्थिती !

Share News:

सोशल मीडिया वर एक पोस्ट अतिशय वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात आलेली आहे की मंदिरा जवळ कुठेही निळा, पिवळा झेंडा लाऊ नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईन… हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महाराने जे भीमटे स्तंभ उभारले आहे ते तत्काळ काढून टाकावे. मंदिराच्या चारही दरवाजा वरुन ये जा बंद करावी. चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे. जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल.
तसेच सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जाती सोबत मांग, महार ढोर, चांभार इत्यादी ना आपल्या घरी बोलवू नये आणि त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये, त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये, असा इशारा त्या पोस्ट मध्ये केलेला आहे.
या आक्षेपार्ह मजकूराप्रकरणी नाशिकच्या कारंजा ते पंचवटी पोलिस स्टेशन परिसरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल असा हा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. तसेच या अशाप्रकारच्या गलिच्छ वक्तव्यामुळे जमाव संतप्त झालेला आहे. जमाव रस्त्यावर उतरलेला असून दुकाने बंद करण्याचे आव्हान पंचवटी परिसरात करण्यात आलेले आहे. रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे. जसजशी ही बातमी शहरात पसरत आहे तसे लोक तेथे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. अद्याप हे लोड इतरत्र पसरलेल नाही मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासन तेथे तैनात झालेले आहे.

image.png
जो काही वाद पंचवटी परिसरात चालू आहे तो निवळण्याचे काम पोलिस करत आहेत. तर लोकं रस्त्यावर आलेली आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही पत्रके काढण्यात आलेली आहे किंवा पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे त्यांच्या विरुध्द लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिस प्रशासनाने संतप्त जमावाला दिले आहे. परंतु जमाव संतप्त असल्यामुळे जोपर्यंत जे काही पत्रक व्हायरल करण्यात आलेले आहे मंदिर प्रवेशा संदर्भात किंवा इतर बाबिंसदर्भात तर ते पत्रक ज्यांनी व्हायरल केलेले आहे त्यांच्या विरोधात ठोस कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली असून पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्रतिनिधी : मृणाली जठार

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *